-काल, शनिवारी 330 पॉझिटीव्ह रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू
-बरे झाल्याने तब्बल 186 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल, शनिवारी (दि.15) 330 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 186 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
ग्रामीण क्षेत्रात 2241 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1911 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 330 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 194 पुरुष आणि 136 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7390 झाली आहे.
–एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 60005
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7390
-प्राप्त तपासणी अहवाल : 59853
-प्रलंबित तपासणी अहवाल : 152
-निगेटिव्ह अहवाल : 52464
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 205
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2905
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 4280
Previous Articleडोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्ट यांचे निधन
Next Article खास गणेशोत्सवाकरिता सोडण्यात आल्या दोन गाड्या









