मंगळवारी 311 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर, 8 जणांचा मृत्यू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांची माहिती
सोलापुर / प्रतिनिधी
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मंगळवारी 311 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 103 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 10 हजार 27 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 1213 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 311 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 311 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 219 पुरुष आणि 92 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10027 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 75268
–ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 10027
-प्राप्त तपासणी अहवाल : 75105
-प्रलंबित तपासणी अहवाल : 163
-निगेटिव्ह अहवाल : 65709
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 283
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2797
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 6947









