प्रतिनिधी / कुर्डुवाडी
सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाअंती देशी विदेशी दारूचा माल मिळून आला. यामध्ये सुमारे २० हजारांचा देशी विदेशी दारूचा माल व मोटारसायकल मिळून सुमारे ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली व त्याबाबत रात्री उशिराने राजू गोविंद तोरणे, विशाल सुरेश वाघ, संदीप पाटील (सर्व रा. कुर्डूवाडी ता माढा ) या तिघांवर कुर्डुवाडी पोलिसांत महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल धनराज विलास गायकवाड यांनी दिली आहे. ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक म. इसाक मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गोलेकर, धनाजी गाडे,मोहन मनसावले, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.









