पंढरपूर / प्रतिनिधी
सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर आहे. याबाबतचे मेडिकल बुलेटीन नुकतेच सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयाच्या वतीने जारी करण्यात आले.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. देशमुख यांच्यावर पित्ताशयाच्या व्याधीची शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी दुपारनंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची व इतर आक्षेपार्ह माहिती समाज माध्यमाद्वारे पसरू लागली. त्यानंतर तात्काळ अश्विनी रुग्णालयाच्या वतीने गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती जाहीर केली आहे.
तर देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पत्रकारांना दिली.









