प्रतिनिधी / करमाळा
करमाळा पोलीस ठाण्यात आज गणेश रावसाहेब नीळ वैगरे लोक यांचे विरूद्ध गणेश मधुकर नीळ याच्यावर खुनी हल्ला करून फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहीती की, निमगाव (ह)येथील गणेश मधुकर नीळ, सतीश नीळ, अंकुश नीळ वैगरे यांच्या सामाईक मालकीच्या जमिनीतून मनगट शाहीच्या जोरावर रस्ता दे म्हणून विजय दिगंबर नीळ पाटील, मारुती विनायक नीळ, व इतर १०/१५ लोकांचा वाद झाला होता. त्यानंतर मारुती विनायक नीळ वैगरे यांनी तहसीलदार करमाळा यांचे कोर्टात रस्ता खुला करण्यात यावा म्हणून केस दाखल केलेली होती.
त्यामध्ये तहसीलदार यांचे कडून योग्य ती चौकशी करून विजय दिगंबर नीळ पाटील, मारुती विनायक नीळ वैगरे यांचा रस्ता मागणीचा अर्ज फेटाळून लावला आहे. व गणेश मधुकर नीळ याच्या बाजूने निकाल दिला आहे. असे असतांनाही गणेश मधुकर नीळ, सतीश मधुकर नीळ वैगरे यांच्या विरोधात राजकीय हेतूने व वैयक्तिक स्वार्थासाठी, विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन नेहमीच शिवीगाळ करणे, मारहाण करून, पत्रा शेड मोडून टाकणे, जनावरांचा चारा जाळून, पाईप लाईन टी फोडून मोडतोड करून,गावात दहशत निर्माण करून वारंवार गणेश मधुकर नीळ याच्या कुटुबियांच्या बरोबर वाद विवाद करत होते व रस्ता दे म्हणून जीवच मारण्याची धमकी देत होते.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजताचे सुमारास शेतात व सायंकाळी ७.३० वाजताचे सुमारास राहते घरी येऊन, घरात घुसून तू रस्ता देत नाही काय असे म्हणून ,गणेश रावसाहेब नीळ, याने लोखंडी रॉड/गजाने कमरेवर मारून , याला जीवच मारा म्हणत गणेश रावसाहेब नीळ, मारुती विनायक नीळ,नागेश लक्ष्मण नीळ, ज्ञानेश्वर पोपट नीळ, अशोक पोपट नीळ यांनी गणेश मधुकर नीळ याचे वर जीवेच मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून मारहाण करून घराच्या वरील मजल्याच्या पॉर्च मधून खाली ढकलून दिले आहे.
त्यामुळे त्याचे दोन्हीही पाय मोडले व जखमी झाले म्हणून करमाळा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक १५ फेब्रुवारी रोजी गु.र.नं.०१५१ भा.द.वि.३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय वरील आरोपी विरूद्ध करमाळा पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांची गावात दहशत आहे. तसेच सदरील फरार आरोपींनी मे.अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब,बार्शी यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. तो अर्ज मे. न्यायालयाने नामंजूर केला आहे.
सदरील फरार आरोपी कुठे आहेत याची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे यांनी सापळा लावून पोलीस नाईक श्रीकांत हराळे, पोलीस कॉन्सटेबल नितीन चव्हाण यांनी गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदरील आरोपी हे पोलीस कस्टडीत आहेत. पुढील तपास दिलीप तळपे हे करत आहेत.