प्रतिनिधी / करमाळा
माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोमवार दि,15 मार्च रोजी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यामध्ये ते 12:30 ते 4:30 या वेळेमध्ये नवनिर्वाचित सरपंच यांच्याशी संवाद साधणार आहेत, त्यांना भेडसावणारे प्रश्न, येणाऱ्या अडचणी संदर्भात विचार विनिमय करणार आहेत.
तसेच सर्व नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार भाजपा संपर्क कार्यालय करमाळा येथे संपन्न होणार आहे, तसेच भाजपा नूतन तालुका कार्यकारणी व जिल्हा पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत व आगामी काळामध्ये पार्टीची ध्येय धोरणे व त्यांना कशा प्रकारे तोंड देता येईल याविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले.









