प्रतिनिधी / बार्शी
संसद आदर्श ग्राम योजना -2 नुसार आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेण्याच्या मार्गदर्शन सूचना केंद्र शासनाने दिल्या होत्या त्यानुसार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यातील सुर्डी हे गाव दत्तक गाव घेण्यासाठी प्रस्ताव आज पाठवला आहे. अशी माहिती दैनिक तरुण भारत संवाद ला दिली.
सविस्तर वृत्त असे की, संसद आदर्श ग्राम योजना भाग दोन 2020 ते 21 साठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या मार्फत प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव संसद आदर्श ग्राम योजना भाग-2 यामध्ये ग्रामविकासासाठी घेण्याचे निर्देश 11 ऑक्टोंबर च्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिले होते. त्यात प्रतिवर्षी आपल्या मतदारसंघात एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा संपूर्ण विकास करण्यासाठी खासदार यांना निर्देश दिले आहेत.
त्याप्रमाणे 2024 पर्यंत पाच गावांची निवड करावी असे निर्देश असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सन 2020 – २१ साठी बार्शी तालुक्यातील सुर्डी हे गाव दत्तक म्हणून मिळावे असा प्रस्ताव आज केंद्र शासनाकडे आणि जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा निवड अधिकारी , संसद आदर्श ग्राम योजना, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद , यांच्याकडे प्रस्थावीत केला आहे . यावर्षी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तालुक्यातील गाव निवडल्याने बार्शी तालुक्यातील गावाचा विकास होणार आहे आणि त्यात सुर्डी हे गाव असल्याने सुर्डीचे ग्रामस्थातांना आनंद झाला आहे मात्र हा प्रस्ताव अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








