100 कार्यकर्ते लाठीमारमध्ये जखमी, 20 हजार आंदोलक दडपशाही निषेध
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
रविवार (दि.9, ऑगस्ट) रोजी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी प्रतिगामी धोरणे आणि जनता विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन संपूर्ण जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याची तयारी केली होती. मात्र पोलीस प्रशासन आंदोलन दडपुन टाकण्यासाठी आंदोलकांवर लाठी उगारली. पांगापांग केले. जवळजवळ 12 हजार आंदोलकांना हुसकवले.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी व कामगारांना परतून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न पोलिसांकडून झाला. प्रामुख्याने एम आय डी सी ,जेलरोड, सदर बझार, पोलीस मुख्यालय याठिकाणी आडम मास्तर यांच्यासह असे एकूण 500 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 100 कार्यकर्ते लाठीमार मध्ये जखमी झाले.ग्रामीण भागात कुंभारी गोदूताई वसाहत येथे 8 हजार आंदोलकांवर दडपशाही करून कडक नाकाबंदी केले. तरीही लोक आक्रमक व उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊन सरकार विरुद्धचा संताप व्यक्त केले.
प्रामुख्याने ताळेबंदीच्या काळातील संपूर्ण वीज बिल सरसकट माफ करावे,तसेच बिडी, यंत्रमाग, असंघटीत कामगार,ऑटो रिक्षा चालक यांनी राज्यसरकार कडे ताळेबंदी च्या काळात आर्थिक मदत मिळण्या करिता 1 लाख कामगारांनी अर्ज दाखल केले ते अनुदान तातडीने अदा करणे सरकार ला क्रमप्राप्त असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटण्यासाठी मज्जाव केले.तात्काळ अटक सत्र सुरू केले याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले.याबाबत मा.राज्यपाल मा.मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री,पोलीस महासंचालक यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती दिली.
यावेळी आडम पुढे बोलताना म्हणाले की, सरकार अन्नधान्य वितरण केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत आजही कोट्यवधी लोक उपासमारीने तडफडत आहेत.अन्नापासून वंचित आहेत.रास्तधान्य वितरणात मोठ्या प्रमाणात काळाबाजार झालेला आहे.गोदामात लाखोटन धान्य उंदीर घुशी खात आहेत.अन्न सडत आहे.परंतु देशवासियांना द्यायला सरकार तयार नाहीत याहून दुसरे दुर्दैव असू शकत नाही.आज पोलीस प्रशासन आंदोलन दडपून टाकले पण अल्पावधीतच याहून उग्र आंदोलन करण्याचा जाहीर इशारा दिला.तेव्हा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही ते म्हणाले.
यावेळी कॉ नरसय्या आडम मास्तर, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, मशप्पा विटे,दाऊद शेख, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अनिल वासम, मोहन कोक्कुल यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, सिद्धपा कलशेट्टी,व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, अब्राहम कुमार, म.हानिफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, दाऊद शेख,जावेद सगरी,अनिल वासम, अशोक बल्ला,दीपक निकंबे, दत्ता चव्हाण,अकील शेख,आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी,शकुंतला पानिभाते, शंकर म्हेत्रे,नरेश दुगाणे,किशोर मेहता,बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, श्रीनिवास गड्डाम, सिद्धाराम उमराणी, सलिम पटेल,पुष्पा पाटील बंडू सगर, लिंगव्वा सोलापूरे अमित मंचले, श्रीकांत कांबळे तसेच विल्यम ससाणे, बापू साबळे,फातिमा बेग,वसीम मुल्ला,विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, सनातन म्हेत्रे,वसीम देशमुख, हसन शेख,प्रभाकर गेंत्याल, सायाना मदगल, विजय हरसुरे, महिबूब गिरगावकर, कादर शेख,राजू गड्डाम, जब्बार मोमीन, हृषीकेश कटके ,गिरीराज कलशेट्टी, चंद्रकांत गोण्याल अफसर शेख सरफराज शेख, मेनुद्दीन मनुयार गोदूताई वसाहतीतील आदी कार्यकर्ते परिश्रम घेतले.









