तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात आज, मंगळवारी नव्याने 2 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाने दोघांचा बळी घेतला असून आतापर्यंत 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 277 वर पोहचली आहे. आज 31 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यामध्ये 18 पुरुष, 13 स्त्रीचा समावेश आहे . उर्वरित 186 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मयत झालेली व्यक्ती रविवार पेठ परिसरातील 52 वर्षाची महिला असून 6 मे रोजी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 11 मे रोजी उपचा रादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परिसरातील 71 वर्षांचे पुरुष असून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाले. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . आज एकूण 133 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 131 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजच्या कोरोना चाचणीत 2 महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आज आढळलेल्या पॉझिटिव रुग्णांपैकी आसरा सोसायटी होटगी रोड 1, शिक्षक सोसायटी 1 असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजतागायत 19 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आज 31 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 72 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 277 मध्ये 158 पुरूष तर 119 महिला आहेत. मृतांची संख्या 19 झाली आहे. 186 व्यक्ती उपचार घेत आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
-होम क्वारंटाईनमध्ये : 2981
-एकूण अहवाल प्राप्त : 3442
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2954
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 277
-अहवाल प्रलंबित : 211
बरे होऊन घरी गेले : 72
मृत- 19
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









