प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथे सात वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. कुत्रा चावल्याने रेबिज होऊन मुलगी मृत्यू पावली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
सोनू भोसले असे त्या मुलीचे नाव आहे. केगाव येथे काही दिवसांपूर्वी कुत्र्याने सोनूचा चावा घेतला होता. त्यात ती जखमी झाली होती. दरम्यान यामुळे मुलीला त्रास होऊ लागला होता. यातच गुरुवारी दुपारी तिचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती सायंकाळी पाच वाजण्याच्या पोलिसांना मिळाली. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बाहरिट, प्रविण पाटील, पोसई देशमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
दरम्यान मुलीची हत्या झाल्याची चर्चा पारिसरात होती. मुलीची हत्या झाली की आत्महत्या याबाबत रात्रीपर्यत पोलिसांकडून खुलासा करण्यात आला नाहि. उत्तरीय तपासणीकरीता मुलीचा मृतदेह शासकीय रुiणालयात पाठविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.