प्रतिनिधी / कुर्डुवाडी
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात स्वाभिमानीच्यावतीने दि.६ रोजी महिंसगाव ता.माढा येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेली ७४ दिवस दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभर दि.६ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ कुर्डुवाडी- बार्शी रस्त्यावर म्हैसगाव येथे दु.१२ वा. स्वाभिमानीच्या वतीने रस्ता आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचा विचार करुन हे कायदे मागे घ्यावे आशा भावना येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठनेते वामन (भाऊ) उबाळे स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील,आजिनाथ परबत,सिद्धेश्वर घुगे,सत्यवान गायकवाड,महावीर सावळे,प्रकाश खारे,दिनेश खाडे,चंद्रकांत कुटे, , इंदू नाना खारे आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.