प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डू येथील ९६ वर्षीय गोदाबाई यांनी कोरोनाशी लढा देत यशस्वीपणे कोरोनावर मात केली आणि सही सलामत घरी परतल्या. आजपर्यंत कोरोनाबाबत अनेक समज गैरसमज समाजमाध्यमावर पसरवले जात होते.परंतू गोदाबाईंच्या या यशस्वी लढ्याने मात्र याला पूर्ण विराम मिळाला आहे. कुर्डूत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह ४४ रुग्ण सापडले होते पैकी दोन मयत झाले असुन ३४ जण उपचार घेऊन परतलेत तर ८ जण उपचार घेत आहेत.
परगावाहून आलेल्या व्यक्तीमुळे सर्वप्रथम कुर्डू मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. पून्हा २३ जण पॉझिटिव्ह आले. यानंतर १३ ऑगस्ट रोजी इतरांच्या संपर्कात आल्यामुळे ९६ वर्षीय गोदाबाई दळवी या कोरोना बाधित झाल्या. त्यांना उपचारासाठी भोसरे हद्दीत असणारे श्रीराम मंगल कार्यालयात दाखल करण्यात आले होते. गोदाबाईं बरोबर त्यांच्या घरातील दहा जण कोरोनाबाधित झाले होते. अशा परिस्थितीत न डगमगता न घाबरता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि दहा दिवसांच्या यशस्वी उपचारा नंतर गोदाबाई कोरोनामुक्त झाल्या. आज सकाळी त्यांच्या सह १३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये त्यांच्यासह घरातील दहा जणांचा समावेश होता. कोरोनावर मात केल्याने सर्वत्र या आजीचे कौतुक होत आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिलोणी खान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पाटलोजी चव्हाण,आरोग्य सहाय्यक शंकर पवार उपस्थित होते.गावात येताच सरपंच जिजाऊ भोसले,उपसरपंच शिवाजी कापरे,नामदेव हांडे,माजी उपसरपंच संदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर व ग्रामस्थांनी स्वागत केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








