प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी गेल्या अनेक वर्षात झाला नाही तेवढा या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आणि तशी पावसाची साथ लाभल्याने ही पिके जोमाने वाढू लागली आहेत. परंतू वाढीसाठी लागणारे रासायनिक खते, औषधांचा शहरात तुटवडा असल्याने एकाच ठिकाणी खते व औषधे खरेदीसाठी शहरात मोठी गर्दी झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वेचा रेक नाही व कोरोनाच्या भीतीमुळे माथाडी कामगारांची माल उतरवण्यास असलेली नापसंती यामुळे शहरात सगळीकडेच खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंढरपुरहून माल मागवण्यात आला असून शहरात एकाच ठिकाणी रासायनिक खते व औषधे उपलब्ध असल्याने शेतकरी रांग लाऊन त्याठिकाणी खते,बी-बियाणे, औषधे खरेदी करत आहेत.
आगाताची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली असून पाऊसही नेहमीपेक्षा यंदा चांगल्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्याला लागणारी खते आणि औषधाची मागणी वाढली परंतू रेल्वेचा रेक व कोरोनामुळे माथाडी कामगारांची माल उतरवण्यास नापसंती यामुळे शहरात खतांचा तुटवडा आहे. आम्ही सर्व दुकानदारांनी पंढरपुराहून खत मागवले आहे.त्यामध्ये माझा माल पहिल्यांदा आल्याने आज एवढी गर्दी दिसत आहे. उद्यापासून माल सगळीकडे उपलब्ध होईल आणि ही गर्दी विखूरली जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








