प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी येथील नगरपालिकेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी व दुकान दारांसाठी एक फतवा काढला जर दुकान उघडायचे असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक असेल. यानुसार बुधवारी पहिल्या दिवशी १८० व्यापारी व नागरिकांनी कोरोना चाचणी केल्या यापैकी १५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी सांगितले.
येथील माढा रोडवरील पंचायत समितीच्या विठ्ठलराव शिंदे सभागृहांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कोरोना ॲन्टीजेन चाचणीस सुरूवात करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनंदा रणदिवे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेश गोरमाले, गोविंद शिंदे, प्रताप ठुबे , आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, अतुल शिंदे चाचणीसाठी सहकार्य केले. यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी भेट दिली.यावेळी स्वच्छता दूत सागर बागल, आकाश गोडगे, अक्षय तोमर , रितेश खरात, दत्ता गायकवाड आदी परिश्रम घेतले.
शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता चाचणी करून घ्यावी. यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी मदत होईल व प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









