प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी नगरपालिका आणि ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरातील किराणा व्यापाऱ्यांची घेण्यात आलेल्या कोविड अँन्टीजेन टेस्ट मध्ये सर्वच्या सर्व व्यापारी निगेटिव्ह आले असल्याचे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी सांगितले.
शहरात व परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वरचेवर वाढत असल्याकारणाने येथील ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व किराणा व्यापाऱ्यांना स्वतः हून अँन्टीजेन टेस्ट करिता आवाहन करण्यात आले होते.यावेळी शहरातील ४० किराणा व्यापाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत आपली टेस्ट करुन घेतली. याचबरोबर ५ कापड व्यापारी व शनिवारी बाधित झालेल्या कुटुंबातील एकूण ७ जणांची अँन्टीजेन टेस्ट ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष अडागळे यांनी घेतली. या टेस्टमधील सर्वच्या सर्व ५२ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे.
याप्रमाणे आता शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापारीवर्गाची वर्गवारी करुन तपासणी करण्यात येणार आहे. ज्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळणार आहे.
तरी शहरातील नागरिकांना व्यापऱ्यांना नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना कुणाला अँटीजेन टेस्ट करायची आहे. त्यांनी रामानंद सरस्वती मंगलकार्यालय आकुलगाव रोड कुर्डुवाडी (धोका मंगलकार्यालय) येथे दुपारी १२.३० वाजता यावे. शहरातील रोज १०० नागरिकांची टेस्ट तीन दिवस घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करुन टेस्ट करुन घ्यावी.वेळीच स्वतः सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित राहण्यास व कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करावे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









