३ लाख ८० हजार रुपयांच्या शेळ्या लंपास
अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील शेळीपालन करणारे पंचशील दिगंबर सोनकांबळे यांचे मोठ्या शेळ्या, बोकड व लहान पिलू असे ३ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या एकूण ४५ शेळ्यांवर अज्ञान चोरट्यांने डल्ला मारला आहे. ही घटना दि १८ रोजी पहाटे निदर्शनास आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पंचशील दिगंबर सोनकांबळे रा किणी, ता. अक्कलकोट हे गेल्या अनेक वर्षांपासून शेळीपालनावर उदरनिर्वाह करतात. दि १७ रोजी पंचशील हे दिवसभर शेळ्या राखून सायंकाळी ७ वाजता घराजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये बांधून जेवण्यासाठी घरी गेले व जेवण करून येऊन दहा वाजता पत्राशेड जवळ झोपी गेले. पहाटेच्या वेळी शेळ्यांचे शेड झाडलोट कारणेकामी गेले असता शेडमधील २ लाख किंमतीच्या २० मोठ्या शेळ्या,६० हजार किंमतीचे ५ मोठे बोकड व १ लाख २० हजार किंमतीचे २० लहान शेळ्या असे ३ लाख ८० हजार किंमतीचे ४५ शेळ्या दिसून आले नाहीत त्यामुळे सर्वत्र शोध घेण्यात आले पण सापडून आले नाहीत. कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरीच्या उद्देशाने शेळ्यांची चोरी केली आहे म्हणून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्यादी पंचशील दिगंबर सोनकांबळे यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.









