अक्कलकोट / प्रतिनिधी
दुधनीचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुधनी जवळील शेतमळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या निधनाची वार्ता कळताच अक्कलकोट तालुक्यासह अफजलपुर ,गुलबर्गा ,आळंद ,सोलापूर आदी ठिकाणाहून हजारो समर्थकांनी ,काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दुधनी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती .शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सातलिंगप्पा म्हेत्रे यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सुरुवात करण्यात आली. ही अंत्ययात्रा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुधनी जवळील त्यांच्या शेतमळ्याजवळ आली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे ,शंकर म्हेत्रे, युवा नेते शिवराज म्हेत्रे व म्हेत्रे परिवारातील सदस्यांसह उस्मानाबादचे शंकर बोरकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, एम वाय पाटील, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार बी आर पाटील, सिद्रामाप्पा पाटील, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजयराजे भोसले ,विश्वस्त अमोल राजे भोसले, नगरसेवक महेश इंगळे ,बसलिंग खेडगी, अश्पाक बळोरगी, उत्तम गायकवाड, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे, मैंदर्गी नगराध्यक्ष दीप्ती केसुर, दुधनी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे ,सभापती सुनंदा गायकवाड, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील ,आनंद तानवडे ,भीमा कापसे, सद्दाम शेरीकर ,बाबा पाटील ,अरुण जाधव ,मंगल पाटील, विलासराव गव्हाणे, आनंदराव सोनकांबळे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,विविध पक्षाचे राजकीय नेते, व्यापारीवर्ग ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









