प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहरासह तालुक्यात आज एकूण ३१० रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात २८ पुरुष तर १९ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून यावर शासनाकडून नियंत्रण असने सद्यस्थितील काळाची गरज आहे. कारण सर्व काही वातावरण मोकळे असल्याने कोरोनाबाधिताची वरचेवर संख्या वाढत चालली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आज करमाळा शहरात १४३ रॅपिड टेस्टमध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १६७ रॅपिड टेस्टमध्ये २३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज ५२ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ७६९ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४५१ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२४२ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील २४ कोरोनाबाधीत
किल्ला विभाग १ पुरुष, कृष्णाजीनगर ३ महिला, जामखेडरोड १ पुरुष, भीमनगर १ पुरुष, कुंकू गल्ली २ पुरुष, भवानीपेठ ३ पुरुष , मंगळवार पेठ ५ पुरुष, मारवाडगल्ली १ महिला, मेनरोड १ पुरुष, १ महिला जैन मंदिर परिसर १ महिला, खडकपुरा १ पुरुष, २ महिला, महात्मा गांधी विद्यालय १ पुरुष ७२ बंगले १ महिला.
ग्रामीण भागातील २३ कोरोनाबाधीत
श्रीदेवीचामाळ १ पुरुष, १ महिला रावगाव १, पुरुषजेऊर ४ पुरुष, १ महिला उमरड १ पुरुष, गुलमोहरवाडी ३ महिला देलवडी १ महिला, वांगी ४ पुरुष, २ महिला झरे १ पुरुष, १ महिला, निमगाव १ महिला, केम १ पुरुष.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









