प्रतिनिधी / करमाळा
करमाळा येथील महाराजा वाईन शॉप येथे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने व पोलीस कॉन्स्टेबल सूरज तनपुरे, प्रदीप पायघन, गणेश शिंदे, संदीप शिंदे , विलास ओमासे यांनी अचानक धाङ टाकली असता दुकानदार विना मास्क सर्विस देताना दिसून आल्याने त्यांच्यासह विना मास्क असलेल्या 21 गिऱ्हाईकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दुकानदार शेख यांच्यावतीने चालक अजय साने यांना 1 हजार रुपये दंड व विना मास्क गिर्हाईकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला.
या कारवाईमुळे करमाळा शहरात अचानक खळबळ उडाल्याने इतर दुकानदार व व्यवसायिकांनी आपापली दुकाने ताबडतोब बंद केली. करमाळा शहरामध्ये पोलीस खात्यातर्फे आजपासून कडक कारवाईला सुरुवात केली असून यापुढे जास्तीत जास्त केसेस करण्याची तजवीज ठेवली आहे.
या कारवाईत महाराजा वाईन शॉपचे मालक एस. एम. शेख, अजय साने ,राहुल गोरख पाटील ,अंकुश वसंत सुरवसे,बाळासाहेब नवनाथ घाडगे,परमेश्वर बबन इंदलकर,इरफान पठाण,निळकंठ गंगाधर हिंगसे, सुरज विलास कांबळे,अजिंक्य नवनाथ कांबळे, महेश कांतीलाल परदेशी,सूरज अशोक देशमाने,शिवाजी पांडुरंग खंडागळे,फिरोज इस्माईल मिर्झा,सागर लक्ष्मण फंड,विक्रम सुखदेव खरात,राहुल रमेश खरात,अभिजित गोवर्धन डुकळे,सतिश दत्तू भोसले,लक्ष्मण ज्ञानदेव दगडे, बाबू भागवत ,यशवंत राखुंडे,बालू पठाण ,सैदास निजाम काळे,आदि गिऱ्हाईकावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाङुळे यांनी सांगितले.









