प्रतिनिधी / कुर्डुवाडी
सिरसदेवी ता. गेवराई जि.बीड येथून रोपळे ता. पंढरपुर येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी दुचाकी एम एच २३ एस ६४१८ वरुन जात असताना दुचाकीस्वाराला समोरून येणाऱ्या एस टी बस एम एच २० बी एल २०८७ ची जोरात धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
ही घटना दि. २९ रोजी सकाळी ६.३० ते ७ वा. दरम्यान कुर्डुवाडी – पंढरपुर रोडवर कुर्डू हद्दीत घडली. विकास सर्जेराव अडागळे रा. सिरसदेवी ता. गेवराई जि.बीड असे अपघातातील मृताचे नाव आहे. याबाबत श्याम सर्जेराव अडागळे यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत बस चालक माधव खंडेराव घोरपडे वय ५५ रा.नाथरी ता.परळी जि.बीड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.









