प्रतिनिधी / सोलापूर
बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरधरू लागला आला असून बिहारमधील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलीमीन एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांची निवड करण्यात आली आली आहे. किशनगंजमधील एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.
एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी सोलापुरातून शहराध्यक्षपदी यांची निवड केली. एमआयएमच्यावतीने बिहार विधानसभेच्या मधील 29 जागा लढविण्यात येत आहे. बिहारमध्ये एमआयएम, एसजेडी, बीएसपी, आरएलएसपी यांच्यासोबत आघाडी केली आहे. या आघाड्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी हे उद्या शुक्रवारी बिहारला रवाना होणार आहेत.
बिहार मधील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची
एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील किशनगंज या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचारासाठी माझी निवड केली आहे. बिहारमधील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. एमआयएमने आजपर्यंत आपल्यावरती जी जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. – फारुख शाब्दी, शहराध्यक्ष एमआयएम, सोलापूर
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









