एमआयएम कार्यकर्ते, आचारी जाणार ; सफाईबरोबर सर्वांना देणार जेवण
सर्व जिल्ह्यासह राज्यातून मदतीचा ओघ सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोकण , सांगली, सातारा, कोल्हापुरात महापूर आल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या उपस्थित शनिवारी सोलापुरातून चादरी, जेवण, पाण्याच्या बाटल्या, औषधे, कपडे इत्यादी गाडी कोकणच्या चिपळूण येथे पाठवण्यात आली आहे.
महापुरामुळे सांगली ,सातारा ,कोल्हापूर या ठिकाणी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. दरम्यान सोलापुरातील एमआयएम च्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत शनिवार दिनांक 31 जुलै रोजी पासपोर्ट कार्यालयातील दारुलस्लाम एमआयएम कार्यालय येथून कोकणकडे पाठवली.
यावेळी बोलताना नगरसेवक खरादी म्हणाले, सांगली, सातारा, कोल्हापूर ,कोकण येथील नागरिकांना सर्वांनी मदत करावी. एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी मोठे मन दाखवत मदत केली आहे. इतरांनाही मदत करावी अशी अपेक्षा खरादी यांनी व्यक्त केली.
एकजूट होऊन माणूसकी धर्म म्हणून मदत करावी
महापुरामुळे कोल्हापूर ,कोकण ,सांगली ,सातारा येथील नागरिक त्रस्त आहेत. येथील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. माणुसकी धर्म, सामाजिक बांधिलकी म्हणून एमआयएम शहर व जिल्हा यांच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी कार्यकर्ते, लहान व महिलांसाठी, कपडे औषधे, जेवण बनवण्यासाठी आचारी मदत करणार आहेत. महापुराच्या वेळीस सर्वांनी एकजूट होऊन माणुसकी धर्म म्हणून मदत करावी.
फारुख शाब्दी, शहराध्यक्ष, एआयएमआयएम