नगरसेवक तोफिक पैलवानसह सात नगरसेवकांचा समावेश
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेखसह सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात सूरु आहे. दरम्यान, याविषयी माजी महापौर आरिफ शेख यांना विचारल्यास असता ते म्हणाले, महापालिका निधी संदर्भात सर्व नगरसेवक खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नाही.
एमआयएमचे नगरसेवकांना अद्यापही भांडवल निधी न दिल्यामुळे नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यामुळे आज सोमवारी नगरसेवक तोफिक शेख 7 नगरसेवकांनी मुंबई गाठली. निधी विषयी खासदार पवारांशी चर्चा झाली असल्याचे शेख यांनी सांगितले. नगरसेवक रियाज खरादी यांना विचारल्यास ते म्हणाले महापालिका निधी संदर्भात खासदार शरद पवार यांच्यासोबत चर्चासाठी नगरसेवक गेले आहेत. राष्ट्रवादीत अद्याप तरी प्रवेश केलेला नाही. मनपा विरोधी पक्षनेते महेश कोठे, तौफिक शेख हे खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. सोशल मीडियासह एमआयएमचे सात नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय पटलावर चर्चा सुरू आहे.









