३६ हजार ८०० रुपयांचा ऑइल गेला चोरीला, अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल
तरुण भारत संवाद तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील विद्युत महावितरणच्या अंतर्गत असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या एकूण ३ विद्युत रोहित्रामधून (डीपी) ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे ४६० लिटर ऑइल अज्ञात चोरट्यांनी अत्यंत शिताफीने लंपास केले आहेत. ही घटना ११ ऑगस्ट रोजी पहाटे निदर्शनास आली. या अज्ञात चोरट्यांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि. ११ रोजी सकाळी १० वाजता एमएसइबी सबस्टेशन येथे काम करताना स्टार अक्वा डीपी, माशाळे दुपटी कारखाना डीपी, विजयबाग डीपी बंद असल्याबाबत फोनवर तक्रार आल्याने कनिष्ठ अभियंता राजदीप कुलकर्णी कनिष्ठ अभियंता, वसीम कोतवाल, समाधान कुंभार हे तिघे रोहित्र तपासणीसाठी वागदरी रोडवरील अक्वा डीपी पाहिले असता डीपीचे डिओ तोडून ८० लिटर ऑइल चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर माशाळे दुपटी कारखाना डीपी तिथूनही डिओ तोडून १४० लिटर तसेच सोलापूर रोडवरील विजयबाग डीपीतून २४० लिटर ऑइल असे तिन्ही डीपी मिळून ३६,८०० रुपये किंमतीचे ४६० लिटर रोहित्रात वापरण्याचे महागडे ऑइल चोरीस गेले आहे.
याबाबत कनिष्ठ अभियंता राजदीप कुलकर्णी कनिष्ठ अभियंता अक्कलकोट यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस नाईक असिफ शेख हे करीत आहेत.