प्रतिनिधी / कुर्डुवाडी
सोशलमिडिया इन्स्टाग्रामवर तू ज्या मुलीशी वारंवार चॅटींग करतोस ती माझी मैत्रिण आहे. तू तिझ्या सोबत वारंवार चॅटींग का करतोस. तुझ्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात मुलींना त्रास देतो, अश्लील मेसेज करतो म्हणून तक्रार देतो.
उद्या सांगोला पोलिस ठाण्यात भेट असे म्हणून रणजित शिर्के रा.पंढरपुर याने धमकी देऊन भाऊ विकास यास मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्यास प्रवृत्त केले असल्याची फिर्याद भाऊ आकाश राजेंद्र ओहोळ यांनी कुर्डुवाडी पोलिसांत दिली आहे. ही घटना दि ३ मार्च रोजी सकाळी ९.३० नंतर भोसरे ता.माढा येथे घडली आहे. याबाबत उशिराने पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे









