प्रतिनिधी / सोलापूर
गेल्या आठ वर्षापासून सर्व आरोग्य मित्र प्रामाणिकपणे रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. परंतू गेल्या आठ वर्षांपासुन योग्य वार्षिक पगारवाढ केली जात नाही. तसेच इतरही मागण्या शासनाने मान्य कराव्या, अन्यथा बेमुदत संपावर जाण्याचा इशारा जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
राजीव गांधी आरोग्य योजना व सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपासुन जिल्हाभर आरोग्य मित्र रुग्णांना सेवा देत आहेत. परंतू त्यांना त्या त्या वेळेस पीएफ, विमा, पगारवाढ केली जात नाही. वेळोवेळी पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले जाते. सध्या कोरोनाच्या जागतिक महामारी मध्ये आरोग्य मित्रांनी स्वतःच्या जिवाची, कुटुंबाची परवा न करता आरोग्य सेवा बजावत आहेत.
परंतू त्यांना सरकारच्या आदेशानुसार कोविड-19 चा भत्ताही दिला गेला नाही. राज्यशासन, विमा कंपनी आणि टी. पी. ए. या तिघांकडून आरोग्य मित्रांची पिळवणूक होत आहे. त्यामूळे मागील २ वर्षापासून राहिलेली पगारवाढ, कोविड-19 चा भत्ता, पीएफ आदी मागण्या मान्य करुन त्याचा लाभ आरोग्य मित्रांना द्यावा,अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्यमित्र येत्या 14 सप्टेंबर पासुन बेमुदत संपावर जातील, असे निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleअजूनीमध्ये परग्रहावरील माणसाची गोष्ट
Next Article सातारा जिल्ह्यात 630 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज









