प्रतिनिधी / बार्शी
महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार सुजितसिंह ठाकूर आणि त्यांचा परिवार आज कोरोणा मुक्त होऊन घरी गेला आहे. आमदार सुजित सिंह ठाकूर हे 12 दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर त्यांच्या परिवाराची चाचणी घेण्यात आली त्यात आमदार सुरेश ठाकूर यांच्या सह 11 कुटुंबीय यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याना व त्यांच्या कुटूंबीय यांना बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल केले होते. आज त्यांना व त्याच्या कुटुंबियांना कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले. या वेळी बार्शीत कॅन्सर हॉस्पिटलला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले या मुळे हॉस्पिटल डॉक्टर , स्टाफ आणि प्रशासन अधिकारी यांचे आभार मानले.
Previous Articleकोल्हापूर : सर्पदंश झालेल्या बालकाचा उपचारा अभावी मृत्यु
Next Article सांगली जिल्हय़ात 21 जणांचा मृत्यू, 280 रूग्ण वाढले









