लक्षणे नसतानाही केटरिंग कॉलेजमध्ये केले क्वारंटाईन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
जिल्हा प्रशासनाने केलेल्या चाचण्यांमध्ये एनटीपीसीमधील 170 कामगारांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यातील 12 कामगारांनी या रिपोर्टवर शंका घेतल्याने मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुन्हा कोरोना चाचणी केली. यावेळी या 12 कामगारांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कामगारांनी नावे न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे 12 रूग्णांचा कोरोना रिपोर्ट आधी पॉझिटिव्ह आणि नंतर निगेटिव्ह आल्याने या चाचण्यांवर शंका व्यक्त होत आहे.
एनटीपीसीमधील 170 कामगारांच्या 20 ऑगस्ट रोजी कोरोना चाचण्या केल्या. यातील 170 कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यावर यातील 12 कर्मचार्यांना या चाचण्यांवर शंका आल्याने त्यांनी 22 ऑगस्ट रोजी मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना चाचण्या केल्या. यामध्ये या 12 ही कामगारांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे एनटीपीसी मधील इतरही कामगार मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोरोना तपासणीसाठी जाणार होते. परंतु या 12 कामगारांसह एकूण 170 कामगारांना कंबर तलाव जवळील केटरिंग कॉलेजमध्ये क्वारंटाईन करून ठेवल्याचे कामगारांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष देण्याची मागणी या कामगारांनी व्यक्त केली.
जिल्हा आरोग्य अधिकार्यांचा प्रतिसादच नाही
ग्रामीण भागातील कोरोनाबाबतची परिस्थिती हाताळण्याचे काम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्याकडे आहे. परंतु याकडे त्यांचे लक्ष नल्याने विविध कंपन्यामधील कामगारांच्या चाचण्या करणे. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे, असे गौडबंगाल सुरू आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू, 470 नवे रुग्ण
Next Article साईने स्वीकारला जॉन यांचा राजीनामा









