प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी अष्टविनायक मोबाइल शॉपी वर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून फिरत असताना स्वच्छता निरीक्षक / नोडल अधिकारी तुकाराम पायगण यांना अष्टविनायक मोबाइल शॉपीमध्ये पाचपेक्षा अधिक लोक जमा असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पायगण व त्यांच्या पथकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अष्टविनायक मोबाइल शॉपी चालकावर दंडात्मक कार्यवाही केली.









