प्रतिनिधी / बार्शी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी बार्शी येथील सेशन न्यायालयाचे न्यायमूर्तींनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सोनावली आहे. गोपाळ उर्फ भैया दुर्योधन पाटील , वय २१ वर्षे पोलीस ठाणे कुर्डुवाडी असे गुन्हेगाराचे नाव आहे.
सरकारी वकील म्हणून अॅड.दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. आरोपीने २०१८ मध्ये अज्ञान पिडीतेला घरी बोलावून अत्याचार केले. या बाबत पिडीतेच्या आजोबांनी आरोपीस विचारणा केली असता, आरोपीने त्यांना मारहाण केली. यावर पिडीतेच्या आईने कुर्डुवाडी पोलीसात आरोपीविरुध्द बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर प्रकरणी आरोपी हा पिडीतेचा जवळचा नातेवाईक असुन सरकारी पक्षाच्यावतीने गुन्हा शाबितीसाठी १० साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने सदर खटला चालू असताना बचावामध्ये पिडीतेचे कुटुंब व आरोपीचे कुटुंब यांचेमध्ये विहीर व जमिन वाद आहेत. असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु पिडीतेचे कुटुंब व आरोपीचे कुटुंब यांचेमध्ये सध्या कोणताही वाद प्रलंबित नाही असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी केला.
सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता विशेष जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ६ अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्त मजुरी वरु . १०,००० / – दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ८ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व ५०० / – रु दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजूरी तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम १२ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व ५०० / – रु दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजूरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपीस भादवि कलम ३२३ अन्वये १ महीना साधा कारावास व ५०० रूपये दंड . दंड न भल्यास १० दिवस साधा कारावास व आरोपीने पिडीतेस नुकसान भरपाई पोटी रक्कम रु ५०,००० / -देणेबाबत मा.न्यायालयाने आदेश केले. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश ही सुनावण्यात आले आहेत.