प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथील एका दहा वर्षाच्या मुलीचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या मुलीचा मृतदेह काल, रविवारी (दि.7) एका विहिरीत आढळून आला. स्नेहा अरविंद दीक्षीत (वय १०, रा.गोगाव ) असे मयत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा नोंद झाला आहे. मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर हे कारण स्पष्ट होणार असल्याचे समजते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्नेहा राहत्या घराजवळून शुक्रवार (दि.5) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह काल एका विहिरीत तरंगताना आढळला. ती इयत्ता ४ थी मध्ये शिकत होती. फिर्यादी अरविंद भारत दिक्षीत (वय-३५, रा.गोगाव ता.अक्कलकोट) यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता.
रविवारी घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे व अनंत गीते आदीसह भेट देऊन तपास केला.
Previous Articleसांगली : स्वार्थी राजकारण्यांनी शेतकरी आंदोलन भडकविले
Next Article अतिवाडमध्ये उन्हाळय़ात भातरोप लागवड









