सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
राज्यातील कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. अखेर आज बुधवारी 14 ऑक्टोबर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोंबर 2020 पर्यंत लेखणी व अवजार बंद आंदोलन पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी 15 दिवसाच्या आत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज बुधवारी घेण्यात आला असून त्याबद्दल उच्च शिक्षण मंत्री सामंत यांचे कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्वर सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी कृती समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यक्ष गजानन काशीद, महासंघ उपाध्यक्ष रविराज शिंदे, महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, सुनील थोरात, उपाध्यक्ष नितीन मुंडफने, रुपाली हुंडेकरी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आनंद पवार, प्रशांत पुजारी फोरमचे अध्यक्ष प्रशांत चोरमले, मलिक रोकडे दिगंबर हराळे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष मलकारसिद्ध हैनाळकर, सचिव सचिन चौधरी, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष वसंतराज सपकाळे उपाध्यक्ष सीता नवगिरे व संघटनेचे सरचिटणीस रविकांत हुक्कीरे हे उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









