तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच असून आज रात्री 8 पर्यंत 41 कोरोना बाधित रुग्णांची भर पडलीय. तर आज कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. तर उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या 21 जणांना आज घरी सोडण्यात आले. तर 608 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती, मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलीय.
शनिवारी 136 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 41 पॉझिटीव्ह तर 95 अहवाल निगेटिव्ह आले. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1543 झाली आहे. आज सापडलेले 41 पॉझिटीव्ह रुग्ण रेसिडेन्सी क्वार्टरस, अश्विनी मेडिकल कॉलेज, जयलक्ष्मी हौसिंग सोसायटी, हैद्राबाद रोड, निराळे वस्ती, विडी घरकुल, शुक्रवार पेठ , सोलापूर बंजारा सोसायटी, विजापूर रोड, मरिआई चौक, विजय देशमुख नगर, नई जिंदगी, हनुमान नगर , भवानी पेठ, वामन नगर, निर्मिती समृध्दी फेस -२, व्यंकटेश नगर , जुना कुंभारी नाका, पदमशाली चौक, मुस्लिम पाच्छा पेठ, गणेश नाईक प्रशाला, सैफुल, इंदिरा नगर , विजापूर रोड, हैद्राबाद रोड, श्रीशैल नगर , भवानी पेठ, संगमेश्वर नगर , अक्कलकोट रोड, जोशी गल्ली , पुना रोड, बाळे प्रतिभा बंगलो, विदयानगर कॉलनी उत्तर कसबा , पाटील गल्ली, अविनाश नगर , एम.आय.डी.सी., रविवार पेठ, सग्गम नगर , मुळेगांव रोड, न्यु पाच्छा पेठ, दत्त नगर, राजु निलकंठ बँक जवळ, एम.आय.डी.सी., कुंभार वेस, मंगळवार पेठ, नॉर्थ सदरबझार, माहेश्वर भवन , भवानी पेठ , गणेश पेठ, उत्तर कसबा, हाजी हजरत खान चाळ , मुरारजी पेठ, न्यु पाच्छा पेठ, रेल्वेलाईन, लक्ष्मी पेठ , गवळी वस्ती, प्रभाकर महाराज मंदिर जवळ आणि सम्राट चौक येथील आहेत.
तसेच भवानी पेठ, तुळजापूर वेस परिसरातील ८१ वर्षाचे पुरुष, पुर्व मंगळवार पेठ, परिसरातील ६१ वर्षाचे स्त्री, कुमठा नाका, न्यु. टी.व्ही . सेंटर परिसरातील ५४ वर्षाचे पुरुष, कुमठा नाका परिसरातील ६३ वर्षाची स्त्री, विनायक नगर , एम.आय.डी.सी. परिसरातील ३१ वर्षाचे पुरुष आणि जुनी विडी घरकुल, हैद्राबाद रोड परिसरातील ५६ वर्षाचे पुरुष या सहा जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित 608 जणांवर उपचार सुरु आहेत.








