सोलापूर / प्रतिनिधी
शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यरत असताना काही अधिकारी-कर्मचारी यांनी कामात हयगय केली. परिणामी कामात हयगय केलेल्या 24 जणांची वेतनवाढ रोखली असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर सोमवारी सांगितले.
शहरातील नागरी आरोग्य केंद्रांची जबाबदारी असतानाही एक महिला वैद्यकीय अधिकारी विनापरवानाच कामावर गैरहजर राहिल्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे आयुक्तांनी शहरातील विविध हॉस्पिटलचे रिपोर्ट नियमित कंट्रोल रूमला कळवावेत, असे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने ते रिपोर्ट स्वत: कडेच ठेवत कंट्रोल रूमला वेळेत दिले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्याही दोन वेतनवाढी रोखत त्यांना समज दिली आहे.
परिणामी कोरोना संदर्भात महापालिका आयुक्तांनी प्रत्येक कर्मचाऱ्यावर स्वतंत्रपणे जबाबदारी सोपविली असताना दिलेली जबाबदारी पार न पाडली नाही. त्यामुळे पंकज उपाध्ये, प्रशांत गुंड, राजकुमार मेश्राम, विष्णू कांबळे, अनिकेत कांबळे, सलमान मनियार, निलेश कंदलगावकर, राहुल कांबळे, आनंद जोशी, अशोक डाके, अरुण खंदाड, सलीम कोरबू, विनायक चिंचुरे, योगीराज याटकर, सलीम वळसंगकर, अर्जुन कदम, रफिक शेख, चंद्रकांत श्रीमंगले, सुलभा भोसले, खलिक मुल्ला, चॉदसो बागवान, के. जी. सातपुते, डॉ. समशादबेगम साचे, डॉ. जयंती आडके यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली.









