प्रतिनिधी / कुर्डुवाडी
बँकेसमोर ग्राहकांची गर्दी असताना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम न पाळता व्यवहार चालू ठेवल्यामुळे येथील सोलापुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या शाखाधिकाऱ्यास नगरपालिकेने ठोठावला ५०० रूपयांचा दंड.
शनिवार व रविवार बँकांना सुट्टी असल्यामुळे सोमवारी बँका चालू होताच बँकांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.तसेच सोमवारपासून बाजारपेठ खूली असल्यामूळे शहरात नागरिकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात होती.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिक स्त्री व पुरुष मोठ्या प्रमाणात होते.याठिकाणी ग्राहकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे व तसेच सोशल डिस्टन्सींगचे कोणतेही पालन केले जात नसल्याकारणाने बँकेचे शाखाधिकारी यांच्यावर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगन यांनी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेल्या दिवशीच आपली दुकाने उघडावीत. बंद दिवशी दुकान उघडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दंडात्मक कारवाई करून सुद्धा जर कोणी दुकाने उघडल्यास त्यांचे सलग चार दिवस दुकान बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगन यांनी सांगितले.








