तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 40 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 36 पुरुष, 4 स्त्रियांचा समावेश आहे. तर तिघांचा मृत्यू झाला असून 94 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 22 तर आतापर्यंत 469 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 1080 वर पोहचली आहे. उर्वरित 517 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
आज तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यापैकी तीन न्यू पाच्छा पेठ परिसरातील तर एक मंगळवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत. मृत्यूनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी जेल सोलापूर 26, महापौर निवास दोन, मरीआई चौक 1, न्यू पच्चा पेठ एक, एन जी मील चाळ मुरारजी पेठ 1, धाकटा राजवाडा कौतम चौक 1, जोडभावी पेठ, सोमवार पेठ, भवानी पेठ मराठा वस्ती लक्ष्मी हाउसिंग सोसायटी कुमठा नाका, भैय्या चौक , कुमठा नाका, मुकुंद नगर भवानी पेठ, जय मल्हार चौक बुधवार पेठ, इ प्रत्येकी एक आदी रुग्णांचा समावेश आहे.
आज एकूण 156 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 116 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 40 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 1080 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 628 पुरुष तर 452स्त्री आहेत. 503 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 94 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 469 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-4941
एकूण अहवाल प्राप्त : 7860
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 6780
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 1080
उपचार सुरू- 517
बरे होऊन घरी गेले : 469
मृत- 94
Previous Articleहिंडाल्को येथील भाजीमार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य
Next Article पुणे विभागातील 5 हजार 900 रुग्ण कोरोनामुक्त









