प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात पैशासाठी सहा वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करणाऱ्या सागर कृष्णप्पा गायकवाड यास विजापूर नाका पोलिसांनी १८ तासाच्या आत अटक करून चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सोलापुरातील टिकेकरवाडी मधील बसवेश्वर नगरातून यश उर्फ माऊली कोळी या चिमुकल्याचे आरोपीने अपहरण केले होते. यानंतर आरोपीने यश याचे वडील दीपक यांना फोन करून पाच लाख रुपयांची मागणी केली. ही माहिती यशाच्या वडिलांनी पोलिसांना दिली. ही घटना कळताच विजापूर नाका पोलिसांनी तत्परता दाखवत रात्रभर त्या मुलाचा शोध घेतला आणि बातमीदारांच्या माहितीनुसार व तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलिसांनी १८ तासाच्या आतच आरोपी सागर गायकवाड यास अटक केले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सहाय्यक उदयसिंह पाटील, पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या टीम ने केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









