सोलापूर : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत सत्तर टक्के विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज सांगितले.
शहरात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर प्रतिबंधात्मक योजना म्हणून महापालिकेच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील पथ विक्रेता, फळ भाजी पाला विक्रेते, किराणा दुकानदार यांनी चाचणी करने, कोरोना निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले होते. जे विक्रेते कोरोनाची चाचणी करुन प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणार नाहीत. त्यांच्यावर लायसन रद्द, ५०० रुपये दंडात्मक कारवाईची व प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. परिणामी आतापर्यंत ७० टक्के फेरीवाले आणि दुकानदार यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेतली आहे. पुढील तीन दिवसांमध्ये उर्वरित फेरीवाले व दुकानदार यांनी कोरोना चाचणी करुण घ्यावी, असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. अन्यथा लायसन रद्द, ५०० रुपये दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
Previous Articleआयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेच कोल्हापूर महापालिकेच्या `प्रशासक’
Next Article सोलापुरात कंटेनरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू









