पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
रेल्वे लाईन भागातील रामलाल चौक परिसरातील राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा जणू संघर्षच पेटला असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न त्या दोघांकडून गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास झाला. तोडफोड करणारे कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचे असल्याचे शहरात बोलले जात आहे. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरु असून कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
बुधवारी रात्री विधानपारिषदेचे आमदार पडळकर यांच्या वाहनावर मड्डी वस्ती भागात दगड मारण्यात आला होता. दगडफेक करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणारे कार्यकर्ते पडळकर यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीचा निषेध करीत एकच चंद, गोपीचंद अशा घोषणा देत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









