तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून दरम्यान आज रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या सरकारचा करायचं काय , खाली मुंडी वर पाय, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा ने छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला होता. दरम्यान यावेळी पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरडी आंदोलन करण्यात आले









