आता मूक मोर्चा नसून ठोक मोर्चा, कोल्हापूर नंतर सोलापुरात मोर्चाचे नियोजन करणार,लवकरच तारीख जाहीर करणार
प्रतिनिधी / सोलापूर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाला आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी संचालक नरेंद्र पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात आंदोलन करण्याचा निर्धार मराठा समाजाच्या बैठकित घेण्यात आला. लवकरच चर्चा करून तारीख जाहीर करणार आहेत.
मराठा आरक्षणा संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी सोलापुरातील जुनी पोलीस लाईन्स येथील कै.अण्णासाहेब पाटील मंगल कार्यालय येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा चे प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, किरण पवार, बाळासाहेब पुणेकर, अनंत जाधव, सदाशिव पवार,हेमंत पिंगळे, सोमनाथ राऊत, योगेश पवार, बाळासाहेब गायकवाड,निशांत साळवे,उमाकांत कारंडे,युवराज पाटील, समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
16 जुन पर्यंत मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घ्यावा असे अल्टिमेट खासदार संभाजी महाराज महाराजांनी राज्य शासनाला दिला आहे. आरक्षणासंदर्भात निर्णय न झाल्यास कोल्हापुरातून पहिला मोर्चा करू असा इशाराही दिला आहे. मराठा च्या विविध मागण्यासाठी सोलापुरात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे आता मूक मोर्चा नसून ठोक मोर्चा काढू,मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी असणार आहे. कोल्हापूर नंतर सोलापुरात मोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे. तिने मान्यवरांशी बोलून लवकरच तारीख जाहीर करू असेही मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक श्रीकांत घाडगे यांनी सांगितले.
सोलापुरात उग्र आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी तब्बल राज्यभरात मोर्चा काढण्यात आले. मात्र राज्य आणि केंद्र शासनाच्या चुकीमुळे, बेजबाबदारपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. इतक्या दिवस सहन केलं पण आता सहन करणार नाही. सोलापुरात उग्र आंदोलन करू. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे हीच आमची मागणी. – श्रीकांत घाडगे – मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक