प्रतिनिधी/सोलापूर
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे. सोलापुरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण असून सरासरी 16.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी कमाल तापमान 25.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअम होते. मंगळवारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 13.9 मिलीमीटर पाऊस झाला. सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सोलापुरात 2.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाला. बुधवारीही दिवसभर अधुनमधून विश्रांती घेत पाऊस सुरु होता. सुर्यदर्शन झाले नाही. दिवसभराच्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहनचालकांची गैरसोय झाली. सोलापूर शहरासोबतच जिह्यातही सर्वत्र पाऊस आहे.
दौंड येथील विसर्ग वाढल्याने उजनी धरणातील पाणीसाठÎात वाढ होत आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत उजनी धरणात 1752.09 दलघमी म्हणजे उणे 1.79 टीएमसी इतका पाणीसाठा होता. टक्केवारी 3.34 इतकी होती. दौंड येथून 8791 क्युसेक इतका विसर्ग उजनी धरणात येत आहे.