एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 435 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 50 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 34 पुरुष, 16 स्त्रियांचा समावेश आहे. तर तिघांचा मृत्यू झाला असून कोरोनाने 29 वा बळी घेतला आहे. आज 7 तर आतापर्यंत 165 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 435 वर पोहचली आहे. उर्वरित 241 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली.
आज ज्या तीन व्यक्ती मृत पावल्या आहेत यात 54 वर्षाचे आणि 55 वर्षाचे दोन पुरुष शुक्रवार पेठ परिसरातील आहे. उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर मृत पावले. तिसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती येथील 60 वर्षीय पुरूष असून सिव्हीलमध्ये दाखल झाली होती उपचारा दरम्यान मृत पावली. त्यानंतर तीघांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांपैकी निलम नगर – 4, किसन संकुल, अक्कलकोट रोड – 1, हत्तुरे वस्ती – 1 मयत , इरन्ना वस्ती – 1 मयत, जोशी गल्ली – 2, कुमठा नाका – 5 , बुधवार पेठ – 2, जुना कुंभारी नाका – 1,अशोक चौक- 2 , नई जिंदगी – 1, दत्त चौक – 1 , न्यु पाच्छा पेठ – 1 , इंदिरा नगर – 1, लोकमान्य नगर – 1, मिलंद नगर न्यु बुधवार पेठ – 12 , मोदी – 1 ,मुरारजी पेठ – 1, पाच्छा पेठ -2, रेल्वे लाईन- 2, रविवार पेठ – 3, साईबाबा चौक – 2, साठे पाटील वस्ती- 1 , शिवशरण नगर एमआयडीसी – 1 , सिध्देश्वर पेठ – 1 असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 319 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 269 जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला तर 50 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाबधितची संख्या 435 वर गेली आहे. आतापर्यंत 435 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 243 पुरुष तर 192 स्त्री आहेत. 241 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 29व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 165 जणांना घरी सोडण्यात आले आहेत
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-6023
एकूण अहवाल प्राप्त : 4418
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 3983
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 435
उपचार सुरू- 241
बरे होऊन घरी गेले : 165
मृत- 29
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








