तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात गुरुवारी नव्याने 22 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाने एकाचा बळी घेतला असून आतापर्यंत 22 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 330 वर पोहचली आहे. तर आज 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामध्ये 14 पुरुष आणि 8 स्त्रीयांचा समावेश आहे. उर्वरित 202 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मयत झालेली 65 वर्षाची महिला नई जिंदगी येथे राहत होती. 12 मे रोजी सिव्हिल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकूण 121 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 99 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत तर 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज आढळलेल्या रुग्णांपैकी निलम नगर एमआयडीसी रोड 2, कोनापूरे चाळ रेल्वे लाईन्स 2, कुमठा नाका 1, नई जिंदगी 1, नवनाथ नगर एमआयडीसी 3, अशोक चौक 7, न्यू पाच्छा पेठ 6, लष्कर 1 हे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर आज 22 व्यक्ती बरे होऊन घरी गेल्या आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 106 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या 330 मध्ये 181 पुरूष तर 149 महिला आहेत. सोलापुरातील मृतांची संख्या 22 झाली आहे तर 202 व्यक्ती उपचार घेत आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती :-
-होम क्वरटाईनमध्ये : 3953
-एकूण अहवाल प्राप्त : 3481
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 315
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 330
-अहवाल प्रलंबित : 232
-बरे होऊन घरी गेले : 106
-मृत : 22