प्रतिनिधी / सोलापूर
मौलाली चौकातील कोंचीकोरवी गल्ली येथे एकावर कोयता व रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अकरा जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल रमेश श्रीराम (वय 18, रा. कोंचीकोरवी गल्ली) याच्या फिर्यादीवरुन दुर्गा अण्णारेड्डी उर्फ कुंट्या, बसू अण्णारेड्डी, विजय अशोक श्रीराम, अशोक दुर्गप्पा श्रीराम, रोहित बसू अण्णारेड्डी, राहुल बसू अण्णारेड्डी, अरुणा बसू अण्णारेड्डी, पिंकी अशोक श्रीराम, कामप्पा अण्णारेड्डी (सर्व रा. कोंचीकोरवी गल्ली), विजय कदर, यल्लप्पा कदर (दोघे रा. अशोक चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रागाने बघणार्या मुलाकडे लक्ष द्या असच समजावून सांगितल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता व राँडने फिर्यादीचा भाऊ सुरेश श्रीराम याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









