सुपरस्टार अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित, चाहत्यांकडून आगळा वेगळा उपक्रम
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा सुपरस्टार खिलाडी अक्षयकुमार यांचा लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान सोलापुरातील अक्षय कुमारच्या चाहत्यांकडून, खिलाडी ग्रुप फाउंडेशन सोलापूरच्या वतीने 51 तृतीयपंथीयांना साडी वाटप करण्यात आले. शहरातील अक्षय कुमारच्या चाहत्यांकडून आगळावेगळा उपक्रम केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
तृतीयपंथीयांच्या दिवाळीनिमित्त सन्मान करण्याचे आवाहन अक्षयने समाज माध्यमातून केले होते. त्यानुसार सोलापूर शहरातील सर्व तृतीयपंथी यांचा सन्मान करण्याचे ठरले. दरम्यान पहिल्या टप्प्यात नुकतेच दहा तृतीयपंथीयांचा सन्मान केल्याची माहिती खिलाडी ग्रुपचे प्रमुख सुरेश जगलेकर यांनी दिली. यासह लवकरच आणखी तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी दत्तात्रय पोसा, मार्गदर्शन सुरेश जगलेकर, अध्यक्ष प्रेम गुजर, उपाध्यक्ष मनहर कोंडी, सचिव मयूर बारड, सहसचिव बालाजी वेलपुकोंडा, खजिनदार निरंजन कुलकर्णी, सदस्य तुषार म्हेत्रे, सदस्य चेतन धारा, अजय राजू तलवारे, अमोल हुल्लेरे, करण पेड्डे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









