भारतरत्न इंदिरा नगर येथील वृध्देचा मृत्यू
प्रतिनिधी/सोलापुर :
सोलापुरातील 70 फूट रोडवरील भारतरत्न इंदिरा नगर येथील एका 69 वर्षाच्या महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे, सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 15 वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 13 जणांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर यांनी रविवारी दिली. भारतरत्न इंदिरा नगर येथील परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहिर करण्यात आला आहे. त्या वृध्द माfहलेच्या संपका&त एकुण 8 व्यक्ती आले असून त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोलापुरातील आयसोलेशन वॉडा&त 718 व्यक्ताRची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 505 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 490 व्यक्ताRचा निगेटिव्ह आला आहे, तर 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी आज रविवारी नव्याने एक वृध्द महिलेचा भर पडली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 15 पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर उर्वरित 13 जणांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सोलापुरात आणखी एक कोरोनाबाधित महिलेचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.








