प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात पुन्हा एक सावकारीचा बळी गेला आहे. अहेमद शब्बीर खान (वय 40, रा. कुमार स्वामी नगर मित्र नगर , हैदराबाद रोड सोलापूर ) यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवन यात्राच संपविली आहे.
पत्नीला तू माझ्या बहिणीकडे जाऊन ये असे सांगितले आणि पत्नी बहिणीच्या घरी गेले असता स्वतः घरातील एका दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे .
अहमद खान हे खाजगी वायरमनचे काम करत होते. अहमद खान यांनी शास्त्रीनगर येथील एका सावकाराकडून काही महिन्यांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान अचानक लाकडाऊन लागल्याने व हाताला काम मिळत नसल्याने पैसे देण्यासाठी विलंब झाले आणि शास्त्रीनगर येथील खासगी सावकार यांनी अहमद खान याला तू माझे पैसे कधी देणार आहे तू पैसे दे नाहीतर आणि मुद्दल ही देत नाही कारे तुला बघून घेतो असे वारंवार धमकी देत असल्याचा आरोप अहमद खान यांच्या पत्नीने केले आहे. दरम्यान जोपर्यंत शास्त्रीनगरातील खासगी सावकाराला अटक होत नाही आणि त्याच्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अहमद खान यांच्या नातेवाईकांनी घेतला होता.
पोलिस आयुक्तांकडून शिंदे यांनी नागरिकांना वारंवार आवाहन केले आहे. की जर आपल्याला सावकारकडून कुठला त्रास किंवा तगादा लावण्यात येत असेल तर आमच्याकडे तक्रार दाखल करा आम्ही त्याच्यावर कारवाई करू असे असताना देखील काही लोक अद्यापही पोलिस आयुक्ताकडे न जाता आत्महत्या सारखे कृत्य करू लागले आहेत .
Previous Articleसांगली जिल्ह्यात नवे 250 तर 524 कोरोनामुक्त
Next Article राज्य उत्पादन पथकावर मद्य माफियांचा हल्ला









