तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहारात शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 90 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 9 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 8 जनांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 340 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 90 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 250 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 90 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 55 पुरुषांचा तर 35 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 844 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 10140
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 1844
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 154
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 758
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 932
-प्राप्त तपासणी अहवाल : 10140
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 8296








