एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 667 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 43 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 24 पुरुष, 19 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 3 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाने 66 वा बळी घेतला आहे. आज 32 तर आतापर्यंत 311 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 667 वर पोहचली आहे. उर्वरित 290 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
आज 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये दोन पुरुष, एक स्त्रीचा समावेश आहे. दक्षिण सदर बाजार, मराठा वस्ती भवानी पेठ, महेश नगर जुनी घरकुल परिसरातील मृत व्यक्ती आहेत. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अशोक चौक 4, दत्त नगर पाचा पेठ4, मिलिंद नगर बुधवार पेठ 3, प्रियदर्शनी सोसायटी 1, उत्तर कसबा 1,बोरामनी 1, सोलापूर जिल्हा कारागृह 1, कुमठा नाका, अवंती नगर, नई जिंदगी 1कविता नगर, पोलिस लाईन – 1, जुना विडी घरकुल- 4, विडी घरकुल – 4, मराठा वस्ती, भवानी पेठ -1,पाच्छा पेठ – 1, माधव नगर, सोलापूर – 1, गीता नगर, न्यु पाच्छा पेठ- 1, शिवपार्वती नगर – 1,नन्यु बुधवार पेठ -1, कुमार स्वामी नगर, शेळगी -1, अकलुज, ता. माळशिरस -2, उपरी, ता. पंढरपूर -1, गोपालपुर, ता. पंढरपूर 1, ज्ञानेश्वर नगर, ता. पंढरपूर – 2, करकंभ, ता. पंढरपूर – 1, मधला मारुती, ता. अक्कलकोट -1, भारत गल्ली, ता. अक्कलकोट -1आदी समावेश आहे.
आज एकूण 270 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 227 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 43 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 667 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 359 पुरुष तर 298 स्त्री आहेत. 290 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 66 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-7475
एकूण अहवाल प्राप्त : 6160
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 5493
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 667
उपचार सुरू- 290
बरे होऊन घरी गेले : 311
मृत- 66
Previous Articleमलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, जिवीतहानी टळली
Next Article रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह









